Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे-मारण्याची धमकी

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देखील ही धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अकाऊंटर डिस्ट्रिक्ट पीसीआरला हा धमकीचा फोन आला होता.

Death threat to Nitish Kumar

आज (21 जून) सकाळी दिल्ली पोलिसांच्या अकाउंटर डिस्ट्रिक्ट पीसीआरला नितीश कुमार यांना जीवे-मारणार असल्याचा धमकी फोन आला होता. नितीश कुमार यांना धमकी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांना धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून फोन (Narendra Modi) करणाऱ्याचा शोध लावला आहे. दिल्लीतील मादीपुर भागातील रहिवासी संजय वर्मा या तरुणानं हा फोन कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर संजय वर्माच्या कुटुंबानं त्याच्याबद्दल माहिती दिली आहे.

संजय वर्माच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, संजय कालपासून दारू पीत होता. दारूचे नशेत धुंद असल्यामुळे त्याने हा (Narendra Modi)  फोन कॉल केला असावा, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/death-threat-to-prime-minister-narendra-modi/?feed_id=45295