Narendra Modi | मी मोदींचा फॅन आहे; एलॉन मस्कने मोदींवर केला स्तुती स्तुमनांचा वर्षाव

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहे. 21 जून ते 24 जून या दरम्यान ते अमेरिकेत असणार आहे. आज सकाळी ते अमेरिकेमध्ये पोहोचले आहे. त्या ठिकाणी पोहोचताच मोदींनी उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली. त्यावेळी मस्क यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर स्तुती स्तुमनांचा वर्षाव करत एलॉन मस्क म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताची खूप काळजी वाटते. या दौऱ्यावर असताना त्यांनी टेस्ला कंपनीला भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले आहे. मी नरेंद्र मोदी यांचा फॅन आहे.”

Narendra Modi is all set to do great things for India – Elon Musk

पुढे बोलताना ते म्हणाले, “भारताच्या भविष्यासाठी मी खूप उत्साहित आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारतासाठी खूप चांगल्या गोष्टी करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या विकासासाठी ते नवीन कंपन्यांचे मोकळ्या मनाने स्वागत करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे भारताचा फायदा कसा होईल? याकडे देखील ते लक्ष देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल बोलत असताना एलॉन मस्क यांनी त्यांच्या 2015 च्या भेटीला देखील उजळा दिला. ते म्हणाले, “2015 मध्ये झालेली बैठक खूप छान होती. नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी फ्रीमोंट फॅक्टरीच्या दौरा केला होता. तेव्हापासूनच ते भारतासाठी चांगल्या गोष्टी करू पाहत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/elon-musk-said-that-i-am-a-fan-of-modi/?feed_id=45211