नरेंद्र मोदी अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर- राहुल गांधी

अदानी-अंबानींचे लाऊड स्पीकर आहेत. ातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली या उद्योजकांच्या हवाली करीत आहे. एक दिवस संपूर्ण ते विकून टाकतील, असा घणाघती काँग्रेसचे नेते यांनी मंगळवारी येथे केला. वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या ासाठी येथील शासकीय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदीजींनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील, असे आश्वासन दिले होते. ते मिळाले काय, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सहा हजार रुपये भाव कापसाला दिला जात आहे काय, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले. जनसमुदायाने त्यांच्या या प्रश्नाला प्रतिसाद देत एकसुरात नाही, असे उत्तर दिले.

नरेंद्र मोदी जेथे जातात, तेथे खोटे बोलतात. ते कधी चंद्राची गोष्ट करतात, तर कधी कलम 370च्या विषयावर चर्चा करतात. ांच्या प्रश्नावर मात्र त्यांचे मौन असते. गरिबांना लुटून अंबानी-अदानीचे खिसे भरण्याचे काम नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. या देशाची अर्थव्यवस्था अदानी-अंबानी नाही, तर देशातील सर्वसामान्य गरीब नागरिक चालवित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, हे काँग्रेसचे ध्येयधोरण आहे. परंतु नरेंद्र मोदींचा कारभार याऊलट सुरू आहे. ते अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून ते अदानी-अंबानीच्या हवाली करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.