InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींचे केदारनाथला जाणे म्हणजे नौटंकी – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. सरकारमध्ये बसले आहेत त्यांनी लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे. मात्र सरकार चालवणारे आज राजधानी सोडून हिमालयात जावून बसले आहेत, असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला. तसेच, सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचे केदारनाथला जाणे ही देखील नौटंकी आहे, असेही शरद पवार म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळच्याच एका गुहेत जाऊन ध्यानही केले. यावरुन विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply