नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ ; ममता बॅनर्जी

हुगळी : पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आज ममता बॅनर्जी यांनी रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपला ‘दंगाबाज’ आणि ‘धंदाबाज’, असे नाव दिले. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोल किपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजप नेहमीच म्हणते, की तृणमूल काँग्रेस ‘टोलाबाज’ आहे. मात्र, मी म्हणते, की भाजप ‘दंगाबाज आणि धंदाबाज’ आहे. नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ आहेत. ‘विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही.’

हल्लोबोल करत ममता म्हणाल्या ‘बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.’ पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ममतांनी मोदींची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्याशी केली. ममता म्हणाल्या, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही खराब नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
Comments
Loading...