‘नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता’

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोविड बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसमधून हाेऊ लागली आहे. ज्येष्ठ नेेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवार) पंतप्रधान मोदी यांना देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन परफोर्मिंग असेट असल्याचं चित्र पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे आहे. आमदार चव्हाणांनी नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह केलेले ट्विट चर्चेत आले आहे. त्यामध्ये भारतातील सर्वाेच्च नाकर्ती (बिनकामाची) मालमत्ता असेही चव्हाण यांनी माेंदीना म्हटलं आहे.

याबराेबरच गंगा नदीत सापडलेल्या काेविड बाधितांच्या रूग्णांच्या प्रेतावरूनही भाजपावर टीका केली आहे. आमदार चव्हाण यांच्या टविटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पडू लागल्या आहेत. कोविडच्या काळात मोदी सरकारवर काॅंग्रेसकडून सातत्याने समाज माध्यमातून हल्ला चढविला जात आहे. काेविड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा