पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी दिल्लीत पंतप्रधान यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. या भेटीनंतर ंनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार-मोदी भेट केवळ कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती, की त्यामागे कोणती राजकीय कारणंही आहेत, याच्या चर्चा रंगू  लागल्या आहेत.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी पवारांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची माहिती देत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिलं. त्यात नाशिक आणि नागपूरमधील नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे केंद्राने तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.