InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मोदींनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती’

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं ते झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाराष्ट्रात नवं सरकार आलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. हे सगळं घडविण्याचे शिल्पकार होते शरद पवार. त्यांनी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केलाय. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिलीय.

पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असं जे काही म्हटलं जातं ते खरं नाही. मात्र त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली असा खुलासाही त्यांनी केला.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.