InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 वर्षे देशाचे नेतृत्व करतील – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दिग्गज समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी केलेल्या भाकिताचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 वर्षे देशाचे नेतृत्व करतील, असे म्हटले.

आपला देश खेड्यांमध्ये राहतो. तेथील प्रत्येक गरिबाच्या घरात शौचालय उपलब्ध झाले आणि प्रत्येक गरिबाच्या इंधन गरजा भागल्या; तर त्यावेळी असणारा पंतप्रधान 25 वर्षे देशावर राज्य करेल, असे लोहिया त्यावेळी म्हणाले होते. त्यांचे स्वप्न आता मोदींनी पूर्ण केले आहे, अशी स्तुतिसुमने योगींनी उधळली.

देशातील सामान्य माणसाला आज मोदींबद्दल प्रचंड आदर वाटतो. जनतेचा ओढा त्यांच्याकडे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply