InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांचं हे वागंण बर नव्हं…!

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत माझ्यावर टिका करतांना मी पाकिस्तानची स्तुती केल्याचे विधान केले. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने चुकीच्या माहितीवर अशा प्रकारचा आरोप जाहीर सभेतून करावा हे योग्य नाही. त्यांनी आधी मी काय बोललो याची माहिती मिळवायला हवी होती असा टोला शरद पवारांनी लगावला.

मराठवाडा दौऱ्यातील शेवटचा कार्यकर्ता संवाद मेळावा बीडबायपास रोडवरील सुर्या लॉन येथे आज दुपारी पार पडला. यावेळी शरद पवारांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर टिका करतांनाच पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान संदर्भात केल्याला विधानाला देखील प्रत्युत्तर दिले.पाकिस्तानातील सत्ताधारी आणि सैन्यातील अधिकारी सत्ता कायम राहावी म्हणून सतत भारताविरोधात बोलतात असे मी म्हणालो होतो, ही काय पाकिस्तानची स्तुती झाली का? मी देशाचा संरक्षणमंत्री राहिलो आहे, त्यामुळे पाकिस्तान काय चीज आहे, हे मला चांगल ठाऊक आहे. पण केवळ चुकीच्या माहितीवर पंतप्रधानांनी माझ्यावर टिका करावी हे न शोभणारे आहे. मी पण त्यांच्याबद्दल खूप काही बोलू शकतो, पण पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मला कायम राखायची आहे, त्यामुळे मी बोलणार नाही. मोदींचे हे वागंण बर नव्हं असा टोला देखील पवारांनी मोदींना लगावला.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेने मला भरभरून दिलं आहे, 1967 पासून चौदा निवडणूक लढलो आणि तुम्ही प्रत्येकवेळी मला निवडूण दिलं. राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री झालो, केंद्रात संरक्षण आणि शेती खात्यांचा मंत्री झालो, तुम्ही मला भरभरून दिलं, कशाची कधी कमी पडू दिली नाही आणखी मला काय हवं. म्हणून माझ्या महाराष्ट्रतील शेतकरी, तरूण, विद्यार्थी, कामगार यांच्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत काम करत राहील अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थितांना घातली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.