नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, बायडन यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

मुंबई : गेल्या काही काळात कोरोना काळातील व्यवस्थापन तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. तसेच मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांच्यासह जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे.

जगभरात लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कंसल्टकडून करण्यात आलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. भारतामध्ये 2 हजार 126 प्रौढ व्यक्तींच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणासह मॉर्गिंग कंसल्ट ग्लोबल ली़डल अॅप्रुव्हल रेटिंग ट्रॅकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 66 टक्के अॅप्रुव्हल दाखवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्लोबल अॅप्रुव्हल रेटिंग 66 टक्के आहे.

अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कंसल्टकडून करण्यात आलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेमध्ये ब्रिटन, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यासह 13 देशांच्या नेत्यांवर पंतप्रधान मोदींनी मात करून मोठी आघाडी घेतली. पंतप्रधान मोदींनंतर दुसरे स्थान इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी (६५ टक्के) यांनी मिळवलं आहे. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मेनुअल लोपेझ ओब्राडोर (६३ टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (५४), जर्मन चांसलर अंजेला मार्केल (५३ टक्के), अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन हे आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा