InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन’, नरेंद्र पाटलांचे उदयनराजेंना आव्हान

साताऱ्यात झालेल्या युतीच्या सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे खुले आव्हान नरेंद्र पाटलांनी उदयनराजे यांना दिले.

तसेच विकास कामांबाबत नरेंद्र पाटील म्हणाले की, टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटींचा विकास होता. पत्रकार परिषदेत 18 हजार कोटी झाला. आठ दिवसात हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही. विकास काम मोदींनी आणि आमच्या मंत्र्यांनी केली. तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपल नाव का देताय, कृपाकरून आपण आपल्या पोराकडं पाहावं, असा टोला देखील त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.