Naresh Mhaske | “…अन् अशा लोकांना भेटायची वेळ आली”, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नरेश म्हस्केंचं टीकास्त्र

Naresh Mhaske | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बिहार दौऱ्यावर आहेत. तसेच ते पाटणा इथे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी घणाघात केला आहे.

यांचा जीव मुंबईत अडकला आहे. उत्तर भारतीयांची संख्या पाहता त्यांची मत मिळवण्यासाठी हा बिहार दौरा केला जात आहे. उत्तर भारतीयांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. ज्या लालूप्रसाद यादव आणि या मंडळींनी नेहमी शिवसेनाचा विरोध केला, कायम ही मंडळी बाळासाहेबांच्या विरोधात बोलली, त्यांना हे जाऊन भेटत आहेत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

तसेच, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचा विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते..ती मंडळी आता यांना जवळची वाटत आहे. हे आपल्या स्वभावाप्रमाणेच चालले आहेत. त्या तेजस्वी यादव यांनी यांना येऊन भेटायला पाहिजे. मात्र, हेच या मंडळींना जाऊन भेटतात, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, नरेश म्हस्केंच्या प्रतिक्रियाचं एक ट्विट त्यांनी शेअर केलं आहे. यामध्ये, हार गये यहापर तो..बिटवा चला बिहार, कुर्सी दो, कुर्सी दो..यही इसकी पुकार!’, असं कॅप्शन देत नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.