InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रकाश आंबेडकरांची नथुराम गोडसे यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट; म्हणाले…

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून टेररिस्ट असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला टेररिस्ट म्हटलं पाहिजे. परंतु तो जर कुठल्या धर्माला फॉलो करत असेल तर तो अख्खा धर्म टेररिस्ट आहे, असं कधी होत नाही असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते कोल्हापुरात बोलत होते.

कोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून टेररिस्ट आहे असे मी म्हणत नाही या देशात नथुराम गोडसे हे टेररिस्ट आहे. याचं कारण म्हणजे कोणालाही कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडीने विधानसभेची व्यूहरचना आखण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.