सुशांतच्या मृत्यूचे भांडवल करणाऱ्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? – शिवसेना

सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केल्याचं ‘एम्स’च्या अहवालातून स्पष्ट झाल्यानं शिवसेना कमालीची आक्रमक झाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे सरकार, मुंबई पोलिसांवर आरोप करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सुशांतच्या मृत्यूचे भांडवल करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा देणाऱ्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?’ असा कडवट सवाल शिवसेनेनं केला आहे.

सुशांत प्रकरणाचे राजकीय भांडवल करणाऱ्यांवर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. शिवसेनेचा मुख्य रोख कंगनावर आहे. ‘हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून तिला मारले गेले. तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत.

ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.