भारताचा राष्ट्रीय खेळ नेमका आहे तरी कोणता? हाॅकी की कबड्डी?

भुवनेश्वर | नोव्हेंबर 2018 मध्ये भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ओरीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हॉकीली भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.

नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या हॉकी विश्वचषकाचे यजमानपद ओरीसा भूषवणार आहे.

या विश्वचषकाच्या तयारी संदर्भात झालेल्या बैठकीवेळी नविन पटनायक यांना समजले की भारतात हॉकीला फक्त राष्ट्रीय खेळ मानले जातो. मात्र हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता नाही.

” भारतीय हॉकी संघाने आजपर्यंत ऑलिंपिकमध्ये आठ सुवर्ण पदके तर एक विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्यास पात्र आहे.” ओरीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्रात म्हणाले.

1970 पर्यंत हॉकी हा असा एकच खेळ होता जो जागतिक स्तरावर क्रिडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. मला खात्री आहे की तुम्ही भारतीय हॉकी चाहत्यांची निराशा करणार नाही. हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिल्यास भारताच्या महान खेळडूंना श्रद्धांजली ठरेल.” असे पटनायक यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात पुढे म्हणाले.

नविन पटनायक यांच्या पत्रामुळे आता भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता या वादाला तोंड फुटले आहे.

यावर अर्जून पुरस्कार विजेते कबड्डीपटू रणधिर सिंग यांनी हा भारतीय मातीतील खेळ आहे हा मुद्दा पुढे करत कबड्डीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे.

तर भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने, महाभारतापासून भारतात कुस्ती खेळली जात आहे असे म्हणत कुस्तीला भारताचा राष्ट्रीय खेळ करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

माजी भारतीय कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!

भारतीय कबड्डी संघाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण!

कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.