National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 33 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 11 जागा, स्टाफ नर्स पदाच्या 11 जागा आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) उमेदवारांना दिनांक 24 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View Ad)
महत्वाच्या बातम्या
- Celery Seeds | पोटाच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी करा ओव्याचा वापर
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | कमी दाबाचा पट्टा सक्रिय! राज्यात वादळी पावसाची शक्यता
- Job Vacancies | जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात
- Job Alert | संत गाडगेबाबा विद्यापीठात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.