National Milk Day | गाई-म्हशीच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे शेळीचे दूध, जाणून घ्या फायदे
टीम महाराष्ट्र देशा: आज 26 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये जागतिक दूध दिवस (National Milk Day) साजरा केला जातो. दूध (Milk) हे आपल्या आरोग्य (Health) आणि फिटनेस (Fitness) खूप फायदेशीर असते. त्यामुळे आरोग्यतज्ञ देखील आपल्याला नेहमी दूध पिण्याचे सल्ले देत असतात. कारण दुधामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक आढळतात. बहुतेक लोक गाई-म्हशीच्या दुधाचे सेवन करतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थही गाई-म्हशीच्या दुधाचे बनवलेले वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? शेळी (Goat Milk) चे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अनेकजण दैनंदिन जीवनामध्ये बकरीचे दूध वापरतात. कारण शेळीच्या दुधामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य सुधारते. त्याचबरोबर शेळीच्या दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्या शेळीचे दूध वापरते. कारण शेळीचे दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे आरोग्यतज्ञ ही शेळीचे दूध वापरायचे सल्ले देतात. नियमित शेळीच्या दुधाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती आणि इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते. त्याचबरोबर शेळीच्या दुधाच्या सेवनाने डेंगूसारख्या आजाराचा धोका टाळू शकतो. गाई-म्हशीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध जास्त घट्ट असते.
शेळीच्या दुधाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर शेळीचे दूध हे पचायलाही सोपे असते. त्यामुळे दुधाच्या एलर्जीचा धोका कमी होऊ शकतो. शेळीच्या दुधाच्या वापराने हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो. त्याचबरोबर जळजळ होण्याची समस्या देखील कमी होते. गाई-म्हशीच्या दुधाच्या तुलनेत शेळीच्या दुधाने हाडे लवकर मजबूत होतात. त्याचबरोबर शेळीच्या दुधात अनेक पोषक घटक आढळतात.
शेळीच्या दुधामध्ये कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट, कार्बोहायड्रेट, फायबर, शुगर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे शेळीचे दूध पिल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
निरोगी शरीरासाठी शरीरामध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहेत. शेळीचे दूध हे विटामिन ए साठी एक सर्वोत्तम स्त्रोत आहे. दररोज शेळीचे दूध पिल्याने मोतीबिंदू आणि कर्करोगांसारख्या आजाराचा धोका देखील कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आरोग्यतज्ञ गोवर झाल्यास मुलांना शेळीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. शेळीचे दूध पिल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या देखील कमी होऊ शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Washington Sundar | वॉशिंग्टन सुंदरने न्युझीलँडच्या मैदानावर केला पराक्रम, सुरेश रैना आणि कपिल देव यांचे तोडले रेकॉर्ड
- Mumbai 26/11 Attack | ती घटना आजही अंगावर शहारे आणते…वाचा २६/११ ला काय घडलं होत!
- Constitution Day of India | भारतात संविधान दिवस कधीपासून आणि का साजरा केला जातो?, जाणून घ्या!
- Baba Ramdev | “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”; रामदेव बाबांचं वक्तव्य चर्चेत!
- Eknath Shinde | “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो, काही लोकं…”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.