‘खट्याळ मुलं पण शांत होतात, पण यांचा थयथयाट थांबत नाही’

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या कोरोना लढाईचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये आता देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं कौतुक केल्यानंतर राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे. अशातच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर टीका करत असताना, सरकार कोरोना संबंधित खरे आकडे लपवत असल्याचा आरोप केला होता. याच वक्तव्याचा समाचार घेताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आम्ही कोरोनासबंधित आकडे लपवण्यात तरबेज नाहीत, जे लपवतात त्यांना तो लखलाभ’

त्या पुढे म्हणाल्या की, ‘खट्याळ मुलं पण कधीतरी शांत होतात. पण यांचा थयथयाट कायम सुरूच असतो. आमच्या कामाची उंची त्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी पोटदुखी होते आहे. आम्ही जे करतोय ते जनता पाहत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या कामाचं नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं असताना, महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्वतः च्या पंतप्रधानांना देखील खोटं ठरवत आहेत का?,’ असा खोचक सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा