InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा

 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबतची माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत आज खुलासा केला आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मतभेद होते. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply