Navneet Rana | तुम्ही मॅनेज झालेत का?, नवनीत राणांवर कारवाई का नाही?, कोर्टाचा पोलिसांवर संताप

Navneet Rana | मुंबई : अमरावती येथील भाजप (BJP) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात बोगस जात पडताळणी प्रकरण कोर्टात सुरु आहे. मात्र, यावर अद्याप कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे दंडाकरी न्यायालयाने (Penal Court) पोलिसांना चांगलच झापलं आहे. जयंत वंजारी यांनी कोर्टाने नवनीत राणा विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर पोलीस कारवाई करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणलं. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस मॅनेज झाले का? असा सवाल केला.

नवनीत राणा प्रकरणात कारवाई साठी मुलुंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वेळ मागितला. मात्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशाचा पालन होताना इथं दिसत नाही. कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? असं म्हणत पुन्हा एकदा झापून काढले. तसंच, न्यायालयाने पोलिसांनी अधिक वेळ देण्याची केलेली विनंती नाकारली.

दरम्यान, संबंधित पोलीस उपायुक्त यांना या संदर्भात तातडीने कारवाई अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.