Navneet Rana | “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”, नवनीत राणा कडाडल्या

Navneet Rana | मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. तसेच दोन दिवसात भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून न हटवल्यास महाराष्ट्र बंदची हाक दिली. यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

भगतसिंह कोश्यारी तसं जाणीवपूर्वक बोलले की अचानक विचार न करता बोलले हे माहिती नाही. मात्र, आम्ही स्वतः त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे जावं लागेल, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

तसेच, शिवाजी महाराजांवर असं कोणीही बोलू नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने तर अजिबात बोलू नये. मात्र, यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये, असं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलोव करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही, असा घणाघात राणा यांनी आदित्य ठाकरे आणि शरद पवारांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.