Navneet Rana । “किशोरी पेडणेकर महापौर असताना किती खोके मातोश्रीवर…”; नवनीत राणांचे ठाकरेंवर गंभीर आरोप

Navneet Rana । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट झाले. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा वाद राज्यात सुरु झाला. तेव्हापासूनच  एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर पैसे घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. शिवसेनेच्या ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोके सरकार म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला हिणवलेल आपण रोजच पाहतोय. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत.

शिंदेगटातील आमदारांवर 50 खोके घेऊन बंडखोरी केल्याचा आरोप करण्यात आला. खोके सरकार म्हणत हिणवणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उत्तर दिलं आहे. खोक्यांचं राजकारण आदित्य आणि उद्धव ठाकरेंनीच सुरु केलं असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत ‘खोक्याचं’ राजकारण सुरू केलं. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहचवले, हे संपूर्ण जनतेला माहिती असल्याचं सांगत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

खोक्यांशिवाय उद्धव ठाकरे यांचं पानही हलत नाही अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. खोक्याची प्रथा ही अदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केली असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलवतील तेव्हा केव्हाही जाऊ माझा कोणाशी वाद नाही. मी सिद्धांताची लढाई लढते, असंही राणा यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.