Navneet Rana । “कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर मातोश्रीवर…”; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Navneet Rana । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यामधील वाद मिटला असं वाटत असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा रवी राणा यांना चिमटा काढला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप आणि शिंदे गटाला चांगलंच फैलावर घेतलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख सगळ्यात आळशी माणूस असा केला होता. याचं प्रत्युत्तर देत नवनीत राणा यांनी सुषमा अंधारेंसोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहेत. मुबंईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही टीका केलीय.

त्या म्हणाल्या, “आळशी माणूस ऑफ द इयर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांना शोधता येईल. उद्धव ठाकरे जेवढे संपूर्ण ५६ वर्षांत फिरले नसतील, तेवढे या तीन महिन्यांत फिरले असतील. त्यामुळे आळशी माणूस जर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शोधून घेतला पाहिजे”, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पहिल्यांदाच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली. रवी राणा व बच्चू कडू या दोघांना विनंती आहे, की आधीच अडीच वर्ष आपल्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे. आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.