InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी पेरणी केल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

नवनीत राणा यांनी सोमवारी, 8 जुलैला पेरणी केल्याप्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. मेळघाट दौऱ्यादरम्यान सेमाडोह येथील सन्नू रामलाल चव्हाण यांच्या जमिनीवर पेरणी केली. त्या स्वत: अन्य शेतमजुरांसह जमिनीत बियाणे टाकत असल्याचे चित्रीकरण व्हायरल झाले.

पण, या जमिनीवर पेरा करण्यास व्याघ्र प्रकल्पाकडून मनाई करण्यात आली होती. वनजमिनीवरील हे अतिक्रमण असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक 176 मध्ये ही शेती करण्यात येत असल्याने आता यासंदर्भात उपविभागीय अधिकऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात केलेली पेरणी त्यामुळेच वादात सापडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply