Nawab Malik | तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, गंभीर गुन्हा दाखल!

Nawab Malik | वाशिम : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात (Washim District Sessions Court) राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. त्यावर वाशिम जिल्हा सत्र नायलयाने नवाब मलिक विरोधात पोलिसांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणेदार रफिक शेख यांनी ही माहिती दिली.

नवाब मलिक (Nawab Malik) सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) तुरुंगात आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांनी कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप समिर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केला होता. वानखेडेंनी २४ ऑगस्टला वाशिम सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी मलिक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंचर वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवा, असा आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने पोलिसांना दिले होता. आज या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर वानखेडे (Sameer Wankhede) मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise drug party case) अटक केली होती. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाब मलिक – समिर वानखेडे हा वाद तेव्हा चांगलाच रंगला होता.

नवाब मलिक तुरुंगात –

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. कुर्ल्यातील एका मालमत्तेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकला विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मलिक यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ईडीने नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी शेकडो कोटींची जमीन एका पैशात खरेदी केल्याचे ईडीने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.