फडणवीसांनी एकनाथ खडसे यांच्याकडून विरोधीनेत्याचा क्लास घ्यावा- नवाब मलिक

विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी फडणवीसांनी एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन क्लास घेतला पाहिजे असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढे बोलतांना ते म्हणाले भाजपचा खोटा चेहरा आज जनते समोर आला आहे. खुले मतदान हे नियमाला धरूनच आहे. यात कुठेही नियमभंग नाही. भाजपकडूनच फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी धमक्या देऊ नयेत. उलट त्यांनीच आमचं खुल्या मतदानाचं आव्हान स्वीकारावं.

आम्ही आमच्या दैवतांची नावं घेतली, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पोटात का दुखलं?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, शपथविधीवेळी मंत्र्यांनी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले-शाहू-आंबेडकरांची नावं घेतली, मग देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पोटात का दुखलं? त्यानंतर राज्यपालांनी दिलेली शपथ जशीच्या तशी वाचली, त्यांच्या आरोपत तथ्य नाही, मजबूत विरोधी पक्ष जनतेने दिला आहे, त्याने विरोध न करता बाहेर निघून गेले असा टोला यावेळी छगन भुजबळ यांनी लगावला.

Loading...

छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार मानतो, पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे, छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन अस मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले.

अधिवेशन कायदेशीर

अध्यक्ष दिलीप वळसे पाटील या सभागृहात अधिवेशन बोलवलं, अधिवेशन संस्थगित झाली. सात दिवसाच्या आत सभागृह बोलवत येतं. त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा बैठक झाली. काल राज्यपालांनी परवानगी अधिवेशन दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच तुमचा मुद्दा फेटाळून लावतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. दादागिरी नहीं चलेगी, यासारख्या घोषणा देत भाजप सदस्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला.

बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार पास

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बहुमत चाचणी वेळी ‘हे’ आमदार राहिले तटस्थ

बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआय यांचे एकूण आमदार तटस्थ तर भाजपने सभात्याग केला.  कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. तर शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले. त्यानंतर जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनीही सहमती दर्शवली.

भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभात्याग केला

आजचं विशेष अधिवेशन नियमाला धरून नाही. राष्ट्रगीत झाल्यानंतर विधानसभा संस्थगित होतं. अधिवेशन पुन्हा बोलवायचे असेल तर राज्यपालांचा समन्स घ्यावा लागतो. नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हायला हवी होती. त्याशिवाय अधिवेशन सुरू होऊ शकत नाही. आम्हाला रात्री एक वाजता अधिवेशनाबाबत निरोप आले. आमचे सदस्य पोहचू शकू नये म्हणून आम्हाला रात्री एक वाजता कळवलं का? हे अधिवेशन संविधानानुसार होत नाहीये, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. बहुमत चाचणीच्यावेळी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभात्याग केला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.