InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मोदी, शाह की देवेंद्र? बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण?’

तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे.

अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण? मोदी, शाह की देवेंद्र? जाहीर करा! असे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.