InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपला जनतेने क्लीन बोल्ड केलं आहे – नवाब मलिक

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहेत. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

तसेच नवाब मलिक म्हणाले की, “गडकरी क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे सांगत आहेत. आम्हीही या शक्यतेला नाकारत नाही. मात्र, क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू क्लीन बोल्ड होतो, तसंच भाजपला जनतेने क्लीन बोल्ड केलं आहे. हे त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे.”

Loading...

- Advertisement -

मलिक म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. महाराष्ट्रात प्रशासन ढिम्म झाले आहे. आम्ही राज्यपालांना आज दुपारी साडेचार वाजता भेटणार आहोत. पंचनामे होत नाहीत, विमा कंपन्या काम करत नाहीत, मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मदत मिळत नाही यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहे. भाजपला राज्यातील जनतेने क्लिन बोल्ड केले आहे. मात्र, ते स्वीकारायला तयार नाहीत. गडकरी सांगतात क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे बरोबर आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.