InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘देशात विभाजनकारी मानसिकता निर्माण करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही’

देशात विभाजनकारी मानसिकता निर्माण करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले. धर्माच्या आधारावर नागरिकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरचे लोक आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं पाहिजे याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू होती. पण देशात मुसलमान घुसखोर आहेत असे वातावरण तयार करुन त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होता. मात्र १९ लाख लोकांना नागरिकत्व मिळाले नाही हे समोर आले आहे. त्यात १६ लाख हिंदू, ३ लाख मुस्लिम आहेत. आता १६ लाख हिंदू असल्याचे समोर आल्यावर या १६ लाख हिंदूंचे करायचे काय म्हणून हा कायदा भाजपाने आणला आहे. परंतु त्या राज्यातील लोक धर्मावर आधारित हा कायदा स्वीकारणार नाहीत, असेही नवाब मलिक म्हणाले.

Loading...

घटनेत तरतूद असताना धर्माच्या नावावर नागरिकत्व सुधारणा कायदा करणं योग्य नाही. राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा नागरिकत्व सुधारणा कायदा आणला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच याचा विरोध करेल असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.