काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही : बाळासाहेब थोरात

मुंबई : देशात सध्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची झालेली भेट सध्या खूप चर्चेचा विषय बनलाय. या भेटीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक तर्क वितर्क यावरून लावले जाऊ लागले आहेत.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला. सध्या यूपीए अस्तित्वातच नाहीये, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काॅंग्रेसला वास्तव स्विकारण्याचा सल्ला दिला होता. यावरून काॅंग्रेसकडून नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

एबीपी माझाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वास्तव स्विकारण्यासंबंधी दिलेल्या सल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, काँग्रेसला सल्ला द्यावा एवढी नवाब मलिकांची पात्रता नाही. काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. अशा वक्तव्यांनी आम्ही अस्वस्थ होणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा