‘…..तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हावं लागेल’

केंद्र सरकारचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री बनले असा दावा भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केला आहे. भाजपकडे बहुमत नसतानाही फडणवीस मुख्यमंत्री का बनले असा सवाल आत्तापर्यंत उपस्थित करण्यात येत होता. त्यामागे कारण होते असा दावा हेगडेंनी केला आहे..

खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठीचे 40 हजार कोटी रुपये परत पाठवले असल्यास जनता ते कधीचं सहन करणार नाही. असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हाव लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. हा राज्यावरचा अन्याय असून ही आग देशभरात पसरेल आणि यावर कोणतही राज्य गप्प बसणार नाही असही नवाब मलिक म्हणाले

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.