नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

शिर्डी : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची गेल्या आठवड्यात बुधवारी ईडीकडून चौकशी झाली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनीलॉण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी आजून पुढे केली जात आहे. याप्रकरणी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहेत.

एकीकडे विरोधकांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. तसेच विविध स्तरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत.

यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवाब मलिकांच्या अटकेवर भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक चांगला माणूस आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. नवाब मलिक माणूस चांगला आहे पण जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. ईडीकडे त्यांच्याविरोधात पुरावे आहेत म्हणून अटक केली, असं आठवले म्हणाले.

तर पुढे या सर्व प्रकरणात भाजप सरकारचा काही संबंध नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. कुणाला त्रास द्यावा ही आमची भूमिका नाही. नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकासवाले आहेत. त्यामुळे विकास करा पण भ्रष्टाचार करू नका, कुणाच्याही जमिनी बळकावू नका, असा टोला देखील रामदास आठवलेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा