गल्लीत क्रिकेट जिंकणारे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल
सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे आतापर्यंत 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर अखेर नारायण राणेंनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होती.
पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या हातात जिल्हा बँक आलेली आहे. आता आमचे पुढचे लक्ष महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असावा याकडे राहणार आहे. आता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान होत.
यानंतर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, असं म्हणत नवाब मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपवर हल्लाबोल केला. नव्या वर्षात विरोधकांचे अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात नवे निर्बंध लागू, बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी; अजित पवारांचे आवाहन
- कोविडची वाढीती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील; अजित पवारांचे संकेत
- ‘जिकंलास खरं पण तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता थांबलो’
- …तर राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय असणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
- आता टार्गेट महाराष्ट्र सरकार, विजयानंतर नारायण राणेंची सिंधुदुर्गातून डरकाळी
You must log in to post a comment.