नवाजुद्दीनला झाला लॉकडाऊनचा फायदा; कुटुंबासोबत वाढली जवळकी

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून त्याचे पत्नी आलिया सोबत वाद सुरु होते. मात्र आता कोरोनाच्या काळात हे वाद सुधारत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आलिया आणि नवाजुद्दीनचा प्रेमविवाह झाला होता. मात्र काही दिवसांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळं येण्यास सुरुवात झाली. त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला. आलियानं काही माध्यमांना याविषयी माहिती दिली होती. मुलाखतीतून देखील त्यांच्या या नात्यातील दुराव्याची माहिती चाहत्यांपर्यत पोहचली होती.

काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. त्यात त्यानं आपल्या पत्नीविषयी काही उल्लेख केले होते. ते प्रकरण कोर्टापर्यत गेलं होतं. त्यानंतर आलिया मुंबई सोडून आपल्या माहेरी गेली. नवाजुद्दीनही उत्तर प्रदेशला जाऊन पोहचला. त्या दरम्यान लॉकडाऊन झाल्यानं नवाजुद्दीनला आपल्या फॅमिलीला वेळ देता आला.

मुलांशी संवाद साधता आला. याचा फायदा म्हणजे त्याच्यात आणि आलियात जे वाद होते ते त्यांना मिटवता आले.आता आनंदाची बाब अशी की आलियानं त्याच्याबरोबर एक फोटो काढून ते शेयर करण्यास सुरुवात केली आहे. हे संपूर्ण कुटूंब लवकरच फॉरेन ट्रीपवर जाणार आहे. ते दुबईला जाणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा