Nawazuddin Siddiqui | “चित्रपट प्रेक्षकांना जोडणारा असावा…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर नवाजुद्दीनचं मोठं वक्तव्य

Nawazuddin Siddiqui | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे या चित्रपटाला विरोध होत असला तरी दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर याने धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटीहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटावर अनेक सेलिब्रिटीज प्रतिक्रिया देत आहेत. अशात नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील या चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी चित्रपट ‘जोगी सारा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 26 मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना त्याने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Nawazuddin Siddiqui’s statement on ‘The Kerala Story’

न्यूज 18 सोबत बोलत असताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मी या चित्रपटाशी सहमत आहे. मात्र, एखादी कादंबरी किंवा एखादा  चित्रपट कुणाला दुखवत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही चित्रपट कधीच प्रेक्षकांच्या भावना दुखवण्यासाठी बनवत नाही. चित्रपट प्रेक्षकांना जोडणारा असावा. या चित्रपटावर बंदी घालण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. मात्र, एखाद्या चित्रपटामध्ये माणसं आणि सामाजिक सद्भाव नष्ट करण्याची ताकद असेल, तर ते चुकीचं ठरू शकतं.”

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटमध्ये 32000 महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. धर्मांतर करून कशाप्रकारे त्यांना ISIS मध्ये भरती केलं जातं. हे या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. अभिनेत्री अदा शर्माने या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WzujiP

You might also like

Comments are closed.