InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गडचिरोली जिल्हा बंदचं माओवाद्यांनी केले आवाहन; ठिकठिकाणी लावले लाल बॅनर

माओवाद्यांनी दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 मे रोजी रामको तसेच शिल्पा ध्रुवा या महिला माओवाद्यांना खोटया चकमकीत मारल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे.

या बनरमुळे दुर्गम भागात दहशतीचे सावट पसरले आहे. एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर माओवाद्यांनी बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे, गडचिरोली सी-सिक्स्टी पोलीस कमांडो पथकाचाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.