“आर्यन खानला एनसीबीने सुपर डुपर स्टार बनवलं…” : राम गोपाल वर्मा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर राज्यासह देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. यात नुकतच दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे.

राम गोपाल वर्मांनी ट्वीट करत एनसीबीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यात ते म्हणाले, “शाहरुख खानच्या हुशार आणि खऱ्या चाहत्यांनी खरं तर एनसीबीचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला सुपर डुपर स्टार बनवलं आहे. शाहरुखचा एक सच्चा चाहता म्हणून मला फक्त जय एनसीबी असा नारा द्यावा वाटतोय.” असं राम गोपाल वर्मा त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणाले आहेत.

एनसीबीनेच शाहरुख खानच्या आधी त्याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला लॉन्च केलं असं राम गोपाल वर्मा त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. आर्यन खानवर जर सिनेमा निघाला तर त्याचं नाव ‘रॉकेट’ असेल आणि हिरो म्हणून आर्यन खान त्यात मुख्य भूमिकेत झळकेल असं ते म्हणाले आहेत. शिवाय या सिनेमाची निर्मिती एनसीबी करेल आणि काही राजकीय नेते सह-निर्माते असतील असं म्हणत त्यांनी एनसीबीसह राजकिय नेते आणि मीडियावर निशाणा साधला आहे.

पुढे “एजन्सीसह प्रत्येकाला माहित आहे की आर्यन खानवर लावलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही. निकालात विलंब करण्यासाठी सर्व युक्त्या वापरून झाल्यानंतर तो नक्कीच बाहेर येईल.” असं ही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा