आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेचा फोन NCBच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन घेतला आहे. तिला मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात चौकशी एजन्सीने दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

दरम्यान, अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलवण्याबाबत एनसीबीचे अधिकारी म्हणाले, ‘संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाते. एखाद्याला चौकशीसाठी बोलावणे याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे.

शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी पथकाने आर्यनचे इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यांच्याकडे असल्यास देण्यास सांगितले. एनसीबीने अनन्याचा फोन त्यांच्याकडे ठेवला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला अशा प्रकरणांमध्ये अनेक लोकांची चौकशी करावी लागेल. अनन्या पांडेला चौकशीसाठी आज दोन वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा