NCP | “गुजरातला फाॅक्सकाॅन अन् महाराष्ट्राला पाॅपकार्न”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
NCP | मुंबई : राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर विरोधक बोलण्याची एक संधी सोडत नाहीये. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची सभा पार पडली. या सभेत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मंथन शिबिरात बोलत असतांना छगन भुजबळ यांनी फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेंव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणु असे म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नसल्याचं देखील निदर्शनास आणून दिलं आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरात गेल्याच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी गुजरातला फॉक्सकॉन आणि महाराष्ट्राला पॉपकॉन असा टोला लगावत जहरी टीका केली आहे. तसेच फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबस चा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बस चा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला असं म्हणत भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारचा समाचार घेतला.
यादरम्यान, महाराष्ट्रामधील रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात असल्याचे सांगत, मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिल्याचे भुजबळ म्हणाले. याशिवाय टाटा यांना पत्रात म्हंटलं होतं की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएल च्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा अशी मागणी केली होती, असं देखील भुजबळांनी सांगितलं आहे.
दरम्यान, विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचा दावा भुजबळांनी मंथन शिबिरात करत आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला असा टोला लगावत भुजबळांनी घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंना म्हणाले – “ठाकरेंच्या चित्रपटातील नटी”
- Sharad Pawar | “राज्यातील मराठा नेते शरद पवारांनीच संपवले”, ‘या’ नेत्याचा पवारांवर गंभीर आरोप
- Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान, म्हणाले…
- Gulabrao Patil | “सुषमा अंधारे बाई आहेत, माणूस असता तर दाखवलं असतं”, गुलाबराव पाटलांचा आक्रमक पलटवार!
- Travel Guide | कमी बजेटमध्ये ट्रीप प्लॅन करत असाल, तर भारतातील ‘या’ राज्याला द्या भेट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.