NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका
NCP | मुंबई : शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनीही प्रतिक्रिया देत शीतल म्हात्रेंना खडेबोल सुनावले आहेत.
“जे पेराल तेच उगवणार”
“खरंतर त्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु, शीतल म्हात्रेंनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्यांनी जे पेरलं, तेच आज उगवलं आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच शीतल म्हात्रेंनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुप्रिया सुळे बसलेला एक फोटो व्हायरल केला होता”, असे सुरज चव्हाण म्हणाले आहेत.
आठवण..
सुप्रीयाताईंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एडीटेड फोटो काही दिवसांपूर्वी तुम्ही पोस्ट केला होता.तुमचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच समर्थन मी करत नाही परंतु एक आठवण करून देतो "जे तुम्ही पेराल तेच उगवेल" हे लक्षात राहूद्या. https://t.co/FlpQv7fGZy— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 12, 2023
शीतल म्हात्रेंचं ट्वीट
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”, असे शीतल म्हात्रे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023
दरम्यान, शीतल म्हात्रेंनी रात्री उशिरा पोलीस स्टेशनला जात या प्रकरणी तक्रार दिली आहे. “मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असं असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातंय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असं वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत”, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं…”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे
- Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
- Kalicharan Maharaj | “सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच नावही गेलं अन् चिन्हही”; कालिचरण महाराजांची ठाकरेंवर जहरी टीका
- Sushma Andhare | “त्यांच्या पत्रकार परिषद म्हणजे नाक्यावरच्या बंबाट्या”; सुषमा अंधारेंची सोमय्यांवर जहरी टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.