NCP | “दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार पडणार अन् सत्तेत…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

NCP | बारामती : बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मोठं विधान केलं आहे.

यावेळी त्यांनी शंभुराज देसाई यांनी केलेल्या दाव्याला फटकारत नवनी दावा केला आहे. शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलंय ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं आहे. त्याचबरोबर महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, शंभुराज देसाईंच्या वक्तव्यावर मेहबूब शेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून पुढच्या वेळी शंभुराज देसाई आमदार होणार नाहीत. त्यामुळे शंभुराज यांचा नाईलाज झाला आहे. मी किती प्रामाणिक आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही. पण पाटणची परिस्थिती शंभुराज देसाईंना पुढच्या विधानसभेत कळेल. शंभुराज देसाईंचा देखील विजय शिवतारे होणार, असं मेहबूब शेख म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

तसेच, बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार असल्याचं म्हणत शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच हल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.