NCP | महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र, राज्य सरकारविरोधात घातला शिमगा

NCP | पुणे : कोरोना महामारीला दोन वर्षे झाली. त्यावेळी या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळानंतरही आताही थोडीफार तीच परिस्थिती पहायला मिळत आहे.

“५० खोके एकदम ओके”

मागील ८ वर्षांपासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर होळी करण्यात आली. अशावेळी “५० खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाईची सुबुद्धी येऊ दे,” अशी घोषणा देखील केल्या आहेत.

“जनतेला महागाईतून बाहेर काढता येईल”- Prashant Jagtap

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे बाहेर काढता येईल याकडे सरकारचे लक्ष नाही. हे राज्यातील जनतेला माहीत असून जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करावी अशी सुबुद्धी व्हावी अशीच प्रार्थना आजच्या होळी निमित्ताने देवाकडे केली” असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.