NCP | राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का! दिवाळीनंतर ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
NCP | मुंबई : काही दिवसांपूर्वीच दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) रामराम करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. अशातच ही शक्यता खरी ठरली असून दिवाळीनंतर दिलीप कोल्हे शिंदे गटात प्रवेश करताना जवळपास २५ जणांना घेऊन जाणार असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली.
पक्षात आपली फरफट होत असल्याचे कारण देत दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा इरादा पक्का केला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीसा होईल, असा टोला देखील कोल्हेंनी लगावला आहे.
पक्षात काही मोजक्या लोकांचे वर्चस्व निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक जण इतर पक्षात प्रवेश करत आहेत.पण याबाबत वरिष्ठांना खरी माहिती दिली जात नाही. तसेच महाविकास आघाडी सरकार असताना जुन्या पदाधिकाऱ्यांना अनेक बैठकांसाठी बोलावले जात नव्हते.शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकऱ्याना आतमध्ये देखील प्रवेश दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. यावर मी का जातोय, याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला, असं कोल्हेंनी सुनावल्याचं समजतय.
महत्वाच्या बातम्या :
- Britain | ऐतिहासिक! भारतीय ऋषी सुनक बनणार ब्रिटेनचे पंतप्रधान, मॉर्डंट यांची माघार
- Ashish Shelar | “जे कधी घरातून बाहेर पडले नाहीत, ते आज…”; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Ramdas Kadam | “अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अन्…”, रामदास कदमांचा घणाघात
- Shambhuraj Desai | “राष्ट्रवादीला पुढील अडीच नाहीतर पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत…”; शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्ला
- MNS | “आमची मनं जुळली आहेत, बाकी सर्व जुळून येईल”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.