NCP | शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच छगन भुजबळ रुग्णालयात दाखल, काय आहे कारण?, जाणून घ्या

NCP | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्व शरद पवार (Sharad Pawar) रुग्णालयात होते. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रादी पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ उपचार सुरू आहे.

गेल्या 3 दिवसांपासून छगन भुजबळ यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.

31 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांना ब्रीज कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती.

दरम्यान, शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचे मंथन शिबीर पार पडले. या शिबिराला डॉक्टरांच्या टीमसह शरद पवार हे हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले होते. तब्येत बरी नसल्यामुळे शरद पवार यांनी भाषण सुद्धा केलं नव्हतं. त्यांचं भाषण हे दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.