NCP | शिंदे-फडणवीसांनी केलेल्या अगणित दिल्ली वाऱ्या पूर्णपणे निष्फळ ; राष्ट्रवादीची टीका

NCP | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. आता कर्नाटकने नवा उपद्रव केला आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यावर दावा करण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे. विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार टीका केली आहे.

“राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्यात सरकार स्थापन करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार या सुरळीत कारभाराला अपवाद ठरत आहे. त्यांची कृती आणि ढिसाळ कराभार या दाव्याकरीता अचूक आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले असतानाही सांगलीच्या जत तालुक्यातील तब्बल ४० गावं कर्नाटक राज्यात येणार असल्याचा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला. यातून शिंदे-फडणवीस यांनी केलेल्या अगणित दिल्ली वाऱ्या पूर्णपणे निष्फळ ठरून केंद्रात त्यांचे किती वजन आहे ते दिसून आले,” असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

“महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकमध्ये घेवून जाण्याचा कट परराज्यातील मुख्यमंत्री रचतात. यातून शिंदे-फडणवीस सरकारच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती आली. यापूर्वी देखील महाराष्ट्रातील प्रकल्प परराज्यात जाताना थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे या सरकारकडून जनहीताची अपेक्षा करणे चुकीचेच ठरू शकेल,” असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ? –

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करावा असेही बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटकात सामील होऊ इच्छित असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जत तालुक्यांकडे कर्नाटकची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.