NCP | “शिवसेनेनंतर आता भाजपचा डाव राष्ट्रवादी फोडण्याचा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक आरोप
NCP | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसोबत बंड करुन भाजप (BJP) सोबत युती केली. तसेच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी सत्ता मिळवली. या संपुर्ण डावपेचाला भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे रोहित पवार यांनी भाजप पक्षावर धक्कदायक आरोप केला आहे.
रोहित पवार यांचा धावा –
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली होती. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं देखील ते म्हणाले.
शरद पवार यांची प्रतिक्रिया –
अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजप माघार घेईल याची मला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसंच, राज ठाकरे यांना याचे श्रेय द्यायचे असेल तर देऊन टाका, असा टोलाही पवारांनी लगावला. निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगताच शरद पवारांनी “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल,” असं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming Electric Bike | भारतात पुढच्या महिन्यात लाँच होणार ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मी पूजा झाल्यानंतर रात्रभर दिवा का लावावा? जाणून घ्या
- PM Kisan Yojna | पीएम किसान योजनेचा 12 हप्ता अजून मिळाला नसेल, तर अशा प्रकारे करा चेक
- Raj Thackeray | “प्रिय मित्र…”, राज ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र
- Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीचा पावसाचे थैमान, तर ‘या’ जिल्ह्यात येलो अलर्ट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.