NCP | “हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन…”; राष्ट्रवादीचा जोरदार हल्लाबोल 

NCP | मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आणि सीमा प्रश्नावर सरकारने भूमिका न घेतल्याने  महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यांवर 17 डिसेंबर रोजी मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. महामोर्चाची पूर्ण तयारी झाली असून परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. या महामोर्चावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बस सोडण्याचे नियोजन चालू होते. त्यासाठी महामंडळाकडे बसची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोलिसांची एनओसी मागितल्याचेही त्यांनी सांगितले. याआधी कधीही एनओसीची मागणी करण्यात आली नव्हती मात्र आता महामोर्चा काढणार म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडवणूक केली जात असल्याचं आव्हाड म्हणाले.

तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा महाराष्ट्राचा महामोर्चा आहे, इथं शिंदे गटासारखं इव्हेट करुन माणसं आणावी लागत नाहीत तर ती उत्स्फूर्तपणे महामोर्चाला येणार आहेत असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला चिमटा काढलाय. पुण्यापेक्षा मोठा महामोर्चा मुंबईत असणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.