पूरग्रस्तांना राष्ट्रवादीतर्फे 50 लाखांच्या मदत निधीची घोषणा

राज्यातील पूरपरिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली आहे.  सरकारने यात्रा-दौरे थांबवून तत्काळ पूरग्रस्त भागात मदत पाठवण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.आता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुणांच्या संघटनांनी या सर्वांनी पुढाकार घेऊन मदतकार्याला हातभार लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.

पाणी ओसरताच विदारक परिस्थिती खऱ्या अर्थाने समोर येईल. राष्ट्रवादीचे जेवढेही लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा जवळपास 50 लाखांचा निधी आम्ही देणार आहोत फार मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेलंय. कोल्हापूर -सांगली हा पट्टा महाराष्ट्रातला महत्त्वाचा दुधाचा पट्टा आहे. आता पूरस्थितीमुळे दुधाची 40 टक्के आवक कमी झाली आहे. पुरामुळे शेतीजमिनी, पशुधन, घरे, दुकाने यांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.