InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Lok Sabha 2019 राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. कॉंग्रेस पक्षाने बुधवारी आपली यादी जाहीर केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ जणांचा समावेश होता आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी

रायगड- सुनील तटकरे

बारामती – सुप्रिया सुळे

सातारा – उदयनराजे भोसले

बुलढाणा – राजेंद्र शिंगणे

कोल्हापूर – धनंजय महाडिक

जळगाव- गुलाबराव देवकर

परभणी – राजेश विटेकर

मुंबई उत्तर पूर्व- संजय दीना पाटील

ठाणे – आनन्द परांजपे

कल्याण – बाबाजी पाटील

लक्षद्वीप – महंमद फैजल

हातकणंगले- राजू शेट्टी

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केलेला नाही. मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, पहिल्या यादीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांचे नाव जाहीर केलेले नाही.

बीड, अहमदनगर उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हीसुद्धा नावे जाहीर केली जातील असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

गडाख यांची उमेदवारी जाहीर करुन काम केले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडीलांचा पराभव केला होता. ही जुनी घटना पवार साहेबांनी सांगितली. त्यामुळे पवारसाहेबांनी कुणाचा अपमान केलेला नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply